पुसद येथे श्री विश्वनाथ सिंग बयास नगरपरिषद हिंदी हायस्कूलच्या कनोजे सभागृहात आयोजित नविन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांना शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. नविन शिक्षण धोरण हे लागू झाले आहे.त्यामुळे शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुजींना प्रशिक्षित केले जात आहे. त्याच अनुषंगाने पुसद येथे वर्ग 06 ते 12 चे जवळपास 1025 शिक्षकांना तीन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये नवीन शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा,क्षमता आधारित अध्यापन,प्रश्न नीर्मिती,समग्र प्रगती पत्रक,स्कॅप इत्यादी अनेक विषयावर तासिका घेण्यात आल्या तसेच गट कार्य सुद्धा करण्यात आले यासाठी जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शकांनी सर्व विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले यामध्ये डॉ.आशिष देऊरकर सर मुंगसाजी विद्यालय माणिकडोह,दिपक डोईफोडे सर सुधाकरराव नाईक विद्यालय रोहडा,सैय्यद सलमान सर गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसद,अमोल सरग सर श्री.शिवाजी विद्यालय जांबबाजार,शेख नईम सर शमसुल उलूम उर्दू हायस्कूल पुसद,गजानन जाधव सर श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद,भास्कर गरड सर फुलसिंग नाईक महाविद्यालय.पुसद,संतोष चव्हाण सर रामू नाईक कनिष्ठ महविद्यालय,वरूड.नितिमा रोकडे मॅडम राष्ट्रीय विद्यालय आडगाव, जयवंत मोटे सर यशवंत विद्यालय शेंबाळपिंपरी,विवेक बैस्कार सर राणी लक्ष्मीबाई विद्यालय पुसद. व राज्य स्तरीय तज्ञ मार्गदर्शक घरडे सर यांची विशेष उपस्थिती होती.तसेच रामभाऊ रोगे,लक्ष्मण वाघमारे,दिलीप सारंगे,अनिता पावडे,भारत शेरे, फूरकान अली,अभय सावंकर यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.