.मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पुसदःकाल दि. 4 एप्रिल रोजी शहर पोलीस स्टेशन येथील सभागृहात सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक पार पडली.आगामी काळात येणाऱ्या रामनवमी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती महावीर जयंती हनुमान जयंती गुड फ्रायडे अक्षय तृतीया या जयंती व उत्सवानिमित्त शहरातील व गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या आदेशानुसार हर्षवर्धन बि जे सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील तसेच सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या प्रमूख उपस्थिती शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहामध्ये शांतता समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक, व्यापारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा पर्व समितीचे पदाधिकारी रामनवमी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी, मज्जीद कमिटी पदाधिकारी तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध जाती धर्माचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आगामी जयंती उत्सव सलोख्याने साजरे करावे असे आव्हान श्री.कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्व नागरिकांनी आगामी काळात होणारे सण उत्सव जयंत्या शांततेत व उत्साहात साजरा कराव्यात. हे करीत असताना सोशल मीडियाचा वापर सद्विवेक बुद्धीने करावा, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा पोस्ट करू नयेत, अथवा फॉरवर्ड करू नयेत, पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून या संदर्भात अवगत करावं. पुसद तालुका हा संबेदनशील असून नागरिकांनी श्रीरामनवमी व इत्यादी सण उत्सव शांततेत साजरी करावेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. इत्यादी मुद्यांवर त्यांनी मुद्देसूद मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बैठकीचे संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले तर आभार वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी मानले. यावेळी सभागृहात या शांतता समितीच्या बैठकीला शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शांतता व समितीचे सदस्य विविध जाती-धर्माचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते.
