मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र जयंती निमित्त वैशाख बुद्ध पौर्णिमा विविध उपक्रमाद्वारे व भोजनदान देऊन साजरी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की जगाला शांतीचा करुने चा संदेश देणारे, आत्त: दीप भव स्वयंप्रकाशित व्हा…. या विचाराने प्रेरित होऊन तथागत गौतम बुद्ध यांनी आपला धम्म जागतिक कीर्तीचा बनवला आहे.अशा महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजे वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा होय. भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या आनंद उत्सवात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध रूपास त्रिवार वंदन व बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या मुख्य कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक पूजनीय भन्तेजी नवदीक्षित श्रामनेर संघव असंख्य धम्म बांधवांना त्रिशरण पंचशील व तथागत गौतम बुद्धाचा महानउपदेश यावेळी उपस्थित त्यांना दिला कांबळे परिवाराच्या वतीने बौद्ध पौर्णिमे निमित्त पूजनीय श्रामनेर संघ संघनायक भन्तेजी यांना पवित्र खीरदान व महाभोजन दान देण्यात आले.पूजनीय भंतेजी यांनी उपस्थित श्रामनेर संघ व धम्म बांधव यांना बुद्ध जयंती पर्वावर अनमोल असे मार्गदर्शन करून मंगलमय कामना करीत आशीर्वाद दिले.सर्व कांबळे कुटुंबीयांच्या वतीने पूजनिय भन्ते जी यांना याचना करण्यात आली.या मुख्य कार्यक्रमाला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मभूषण भीमराव दादा कांबळे प्रमुख अतिथी , पुसद शहरपोलीस स्टेशन ठाणेदार उमेश बेसरकर, साहेब गटविकास अधिकारी संजय राठोड, बांडे,केदार साहेब, सुधीर देशमुख,पत्रकार राजेश ढोले, पत्रकार मारुती भस्मे, भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, भोलेनाथ कांबळे, बाळासाहेब कांबळे, गोविंदराव कांबळे,अनुसया बाई गोविंदराव कांबळे,संजय गोविंदराव कांबळे,आम्रपाला बाई संजय कांबळेराजू गोविंदराव कांबळे,ममता राजू कांबळे,किशोर गोविंदराव कांबळे,विशाखा किशोर कांबळे,शिवम कांबळेअतुल कांबळे,रुद्रा कांबळे सम्राट कांबळे,विराट कांबळे तथा समस्त कांबळे परिवार पुसद सह धम्म बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
