संपादक – सुर्यकांत राठोड
सह संपादक – सिद्धार्थ कदम
पुसद -वसुंधरा बहुउद्देशीय संस्था,मिशन ग्रीन व माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन पुसद यांच्या वतीने मागील दहा वर्षांपासून पर्यावरण संतुलनाचे कार्य सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्षांचे संवर्धन करण्या साठी व सर्व पुसद वासियांचे लक्ष पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता,’ खेळूया रंग निसर्गा सोबत ‘ या कार्यक्रमाचे आयोजन भवानी माता टेकडी निंबी पार्डी येथे करण्यात आले होते. भवानी माता टेकडी येथे लावलेल्या वृक्षाचे चे पूजन करून टेकडी वरील सर्व वृक्षांना पाणी देऊन, त्यांची तृष्णा तृप्ती करण्यात आली. नंतर पर्यावरण पूरक पद्धतीने धुलिवंदनाचा सण वृक्षा सोबत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तुळजा भवानी टेकडी निंबी पार्डी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण पुसद वाशियांच्या सहकार्याने केले आणि त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे कार्य अविरत चालू आहे.आजची परिस्थिती पाहता पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः बिघडले आहे.यामुळे वातावरणातील तापमान खूप वाढले आहे.त्याचप्रमाणे हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, प्लास्टिकचा वापरामुळे कचरा प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा विचार करणे ही काळाची गरज आहे.असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले यावेळेस वसुंधरा बहुउद्देशीय संस्था मिशन ग्रीन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन व पुसद परिसरातील निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
