मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पोलीस स्टेशन दिग्रस हददीतील ग्राम फेटरी / साकरी वनविभागाचे जंगल परीसरात दिनांक ०७/०४/२०२५ रोजी एक महिला व एक पुरुष जातीचे दोन अनोळखी मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळुन आले होते, त्यावरुन प्रथम दर्शनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे आकस्मात मृत्युची नोंद घेऊन तपासास सुरुवात करण्यात आली. दोन्ही प्रेतांचे शवविच्छेदना नंतर आकरमात मृत्युतील मृतकांचा मृत्यु हा घातपाताने झाल्याचे व तो अकस्मात मृत्यु नसुन दोन्ही मृतकांचा खुन झाल्याचे निष्पंन्न होताच, पोलीस स्टेशन दिग्रस येथे सरकार तर्फे फिर्याद देऊन अज्ञात आरोपीतां विरुध्द अप.क्र. २७५/२०२५ कलम १०३ (१), २३८, ४९ भा.न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्याने मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ व मा.अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन अनोळखी मृतक व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकरीता पोलीस स्टेशन दिग्रस व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी तपास पथके तयार करुन तपास चक्र फिरवीण्यास सुरुवात केली. दोन्ही बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्याकरीता मृतकांचे फोटो, शारीरीक विवरण व त्यांचे अंगावरील वस्त्र, दागीने, बुट, बेल्ट असे साहित्य व तज्ञ चित्रकाराकडुन तयार करण्यात आलेले स्केच असलेली शोध पत्रीका प्रसारीत करुन, सोशल मिडीया, जिल्हयातील व शेजारील जिल्हयातील पो.स्टे.ला नोंद असलेल्या मिसींग पडताळुन अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्याचा केलेला प्रयत्न व वेगवेगळ्या तपास पथकांनी केलेल्या तपासावरुन असे निष्पन्न झाले की. यातील मृतक महिला ही सौ. वर्षा धनराज गिरे, वय २६ वर्ष, (जात आंध) रा. उमरी बु ता मानोरा जिल्हा वाशिम व मृतक पुरुष हा आकाश विलास बल्लाळ, वय २५ वर्ष, (जात आंध) रा. गोस्ता रुई ता मानोरा जिल्हा वाशिम हे असल्याचे निष्पंन्न झाले, त्यापुढे जाऊन केलेल्या तपासामध्ये मृतक सौ. वर्षा धनराज गिरे ही विवाहीत असुन तीला एक अपत्य सुध्दा आहे. व मृतक आकाश विकास बल्लाळ हा अविवाहीत असुन त्या दोघांचे मागील दोन ते तिन वर्षा पासुन अनैतीक संबंध होते.मृतक वर्षा व तिचे पती धनराज गिरे हे दोघे ऊस तोडणी कामगार असुन ऊस तोडणी कामावर असतांनाच सौ. वर्षा गिरे व आकाश बल्लाळ यांची ओळख होऊन त्यांचे मध्ये अनैतीक संबंध निर्माण झाले होते. दिनांक २८/०३/२०२५ रोजी मृतक वर्षा ही तिचा पती धनराज व मुलासह तिचे उमरी बु ता मानोरा येथील राहते घरी परत आली व त्याच रात्री ती एकटी घर सोडुन तिचा मयत प्रियकर आकाश बल्लाळ याचेसह पुणे येथे निघुन गेले व त्याठिकाणी राहु लागले.मृतक आकाश बल्लाळ याचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ, दोन्ही रा. गोस्ता ता मानोरा जि वाशिम व जावाई विजय भारत शिकारे, रा. विठाळा ता दिग्रस जि यवतमाळ यांना सदर बाबत माहिती पडताच ते त्यांना परत आणनेकरीता भारत शिकारे यांचे पिकअप वाहन क्रमांक एम.एच.२९ बी.ई.९२७० या वाहनाने पुणे येथे जाऊन मृतक याचा मामा विशाल शिकारे यास भेटले व त्यां चौघांनी मृतक आकाश व वर्षा यांचा शोध घेऊन त्यांना भेटुन त्यांना समजाऊन त्या दोघांचे लग्न लाऊन देतो असे म्हणुन दिनांक ०२/०४/२०२५ रोजी पुणे येथून निघुन वाशिम मार्ग पुसद येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायंकाळी आले. पुसद येथे मृतक वर्षा व मृतक आकाश यांना लॉज मध्ये रुम करुन देऊन ते चौघे मृतक यांचे गांवी गोस्ता ता मानोरा येथे परत आले. तेव्हा मृतकाचा भाऊ विकास बल्लाळ, जावाई विजय शिकारे वमामा विशाल शिकारे यांनी आपली समाजात बदनामी होऊनये म्हणुन आकाश बल्लाळ व सौ. वर्षा गिरे यांना जिवानिशी ठार मरण्याचा कटरचला.त्यानंतर दिनांक ०४/०४/२०२५ रोजी यातील दोन्ही मृतक हे पुन्हा पुणे येथे जाण्याकरीता वाशिम येथे गेल्याने वरील चौघेही पुन्हा पिकअप वाहनाने वाशिम येथे पोहचुन त्यांचा दिवसभर शोध घेऊन सायंकाळी मृतक आकाश व वर्षा त्यांना भेटुन तुमचे लग्न लाऊन देतो अशी त्याची समजूत काढुन त्यांना घेऊन रात्री २०/३० वा सुमारास दिग्नस येथे परत आले. त्यादरम्यान आरोपी क्र.०१ विजय शिकारे याने त्याचे सहकारी आरोपी क्र.०२ राजेश गोदमले व आरोपी क्र.०३ धर्मराज बोडखे यांना दारु पिण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवुन त्यांना आपल्याला दोघांना मारायचे आहे असे सांगुन त्यांना खुन करण्यासाठी बोलावीले. त्यानंतर मृतकाचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ व मामा विशाल शिकारे असे गोस्ता जि वाशिम येथे त्यांचे घरी परत गेले. यानंतर मृतकाचा जावाई आरोपी क्र. ०१ विजय शिकारे हा मृतक वर्षा गिरे व मृतक आकाश बल्लाळ या दोघांना त्याचे पिकअप वाहनामध्ये घेऊन त्याचे विठाळा ते साकरी रोडवरील त्याचे शेताजवळ जंगलामध्ये घेऊन आला तेव्हा आरोपी क्र. ०१ विजय शिकारे याने त्याचे सहकारी आरोपी क्र.२ राजेश गोदमले, व आरोपी क्र.३ धर्मराज तुकाराम बोडखे यांना फोन लावुन त्यांना तेथे बोलावुन घेतले. तेव्हा रात्री २२/३० वा दरम्यान आरोपी क्र.२ राजेश गोदमले, व आरोपी क्र.३ धर्मराज तुकाराम बोडखे हे आरोपी क्र. ०१ विजय शिकारे याचे मोटार सायकल वाहनाने विठाळा येथील शेताजवळ आले, तेव्हा नमुद आरोपीतांनी संगणमत करुन यातील मृतक आकाश बल्लाळ व सौ वर्षा गिरे यांना लोखंडी टॉमी/ रॉड ने डोक्यावर मारुन त्यांचा खुन केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने दोघांचे मृतदेह पिकअप वाहनामध्ये टाकुन फेटरी/ साकरी गावाचे वन विभाग जंगल परिसरामध्ये फेकुन दिले. व तेथून निघुन जाऊन काळी दौलत रोडचे पुलाखाली ०२ बॅग ज्यामध्ये मृतकायांचे ओळखपत्र, पैसे, व मोबाईल पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने जाळून टाकले. त्यानंतर आरोपी.क्र.०१ विजय शिकारे याने त्याचे सहकारी आरोपी क्र.०२ व ०३ यांना खुनाचा मोबदला म्हणून ५,०००/- रु ऑनलाईन व ५,०००/- रु नगदी असे एकुण १०,०००/- रुपये दिले आहेत.सदर गुन्हयातील आरोपी क्र. ०१ विजय भारत शिकारे, वय २९ वर्ष, आरोपी क्र.०२ राजेश सोनवा गोदमले, वय ३४ वर्ष, आरोपी क्र.०३ धर्मराज तुकाराम बोडके, वय ३० वर्ष, तिन्ही रा. विठाळा ता दिग्रस जि यवतमाळ आरोपी क्र.०४ विकास विलास बल्लाळ, वय २१ वर्ष रा. गोस्ता ता मानोरा जि वाशिम यांना अटक करण्यात आली तसेच फरार आरोपी क्र.०५ विशाल शिकारे याचा शोध सुरु असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सेवानंद वानखडे पो.स्टे. दिग्नस हे करीत आहेत.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. रजनीकांत चिलुमुला, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविपोअ दारव्हा, पो.नि. सतिश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ श्री. सेवानंद वानखडे, पो.नि. पो.स्टे. दिग्रस, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
