मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
मानोरा प्रतिनिधि मनोज आडे
शेंदुरजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेजाबाबदार धोरणामुळे नागरिकांच्या घशाला कोरड**पंधरवड्यातून एकदा मिळते नागरिकांना पेयजल.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या व जवळपास ५००० लोकसंख्या असलेल्या शेंदुरजना अढाव गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यामध्ये मोठी कसरत करावी लागत असून पंधरा पंधरा दिवस पाणी येत नसल्याने पेयजलाशिवाय जीवन कसे जगावे असा भला मोठा यक्षप्रश्न या गावातील नागरिकांसमोर आ वासून उभा आहे. शासनाकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये नवीन पाईपलाईन टाकून घरोघरी नळ जोडणी केलेली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आलेले असून ईंगलवाडी येथील धरणातून पाणीपुरवठा करनाऱ्या टाकीमध्ये पाणी साठविण्यासाठी जलवाहिनी सुद्धा टाकण्यात आलेली असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना सातत्याने पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याची स्थिती भर उन्हाळ्यात निर्माण झालेली आहे.सार्वजनिक नळ असलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी तासानतास पाण्याची वाट पाहत ताटकळावे लागत असल्याची परिस्थिती या गावात निर्माण झालेली आहे.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  

















