मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक 15/09/2025 रोजी 11/00 वाजण्याचे सुमारांस पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजे-आडगांव फाटा येथे इसम नामे-शेख इरफान ऊर्फ अप्पू शेख रहिमान रा. अमृतनगर खंडाळा यास खंडाळा येथील काही इसमांनी धारधार शस्वाने वार करुन त्यास जिवेठार मारले असल्याबाबत फिर्यादी बेगम वी शेख इरफान ऊर्फ अप्पू वय 60 वर्ष, रा. अमृतनगर खंडाळा ता. पुसद जि. यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन खंडाळा पोलीस स्टेशन अप क्रमांक 325/2025 कलम 103, 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2), 351(3) भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून व सदर गुन्हयातील मारेकरी शोधण्याचे पोलीसांपुढे असलेले कठीण अवाहन पाहता पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता सा यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक श्री सतीष चवरे यांना गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कंम्प पुसद या पथकांस सदरच्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कैम्प पुसद पथकांने तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु करुन गुप्त बातमीदारा कडून माहीती प्राप्त केली असता सदर गुन्हयातील आरोपी 1) शेख बरकत शेख मुसा 2) शेख सबद्र शेख कुरबान हे खंडाळा घाटातील जंगल भागात असून ते पळून जाण्याचे तयारीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने त्यावर सदर पथकांने अभ्यास करुन पोलीस कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हयालील आरोपी शोध कामी खंडाळा जंगाल भागात रवाना होवून त्यांचा पाठलाग करुन कौशल्यपूर्वक व अतिशय शिताफीने ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडे विचारपूस करता यांतील मयत इसम हा गेले । महीन्यापासून शिवीगाळी दमदाटी करुन जिवाने मारण्याची धमकी देत असल्याने तसेच आज रोजी सकाळी काहीएक कारण नसतांना आम्हाला तसेच महीलांना शिवीगाळी करून तो खंडाळा फाटा येथून वाशिम बाजूकडे जात असतांना त्याला चांबवून नेहमी शिवीगाळी का करतो असे विचारले असता आरोपी यांस मारण्याची धमकी दिल्याने त्याचा मनात राग धरुन यांतील आरोपी यांनी त्याचेकडील चाकूने त्याचेवर वार करुन जिवेठार मारले असल्याचे कबूली केले. आरोपी नामे-1) शेख बरकत शेख मुसा वय 36 वर्ष, 2) शेख सबद्र शेख कुरबान वय 22 वर्ष, दोन्ही रा. अमृतनगर खंडाळा यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, हर्षवर्धन बी.जे सा. मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफी/मुन्ना आडे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



























