मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक 18/09/2025 रोजी रात्री 10/00 वाजता ते दिनांक 19/09/2025 रोजी सकाळी 07/00 वाजण्याचे पुर्वी पोलीस स्टेशन वसंतनगर हददीतील वसंतनगर गल्ली क्रमांक 01 मधून एक स्कूटी चोरी गेले असल्याबाबत वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक 319/2025 कलम 303(2) भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.मा. पोलीस निरीक्षक सा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी जिल्हयात मोटार सायकल चोरी मधील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकांने तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन गोपनिय बातमीदार यांच्याकडून माहीती काढण्याचा प्रयत्न करीत होते. दिनांक 19/09/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांच्या आदेशान्वये नमूद पथक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम करीता उपविभाग पुसद हददीत रात्री 23/00 वाजता रवाना होवून आरोपी शोध कारवाई करण्याकरीता रवाना झाले असता त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, दोन इसम तलाव टेकडी जवळ दोन स्कूटी मोटार सायकल घेवून उभे असून सदरच्या स्कूटी चोरीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी रवाना होवून सदर ठिकाणी दोन स्कूटी घेवून उभे असलेल्या इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नामे 1) रोहीत चंद्रशेखर नकवाल वय 23 वर्ष, रा. नवलबाबा वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ 2) शेख समीर शेख जमीर वय 23 वर्ष, रा. तलाव फैल यवतमाळ ह. मु. शिवाजी वार्ड पुसद ता. पुसद जि.यवतमाळ असे सांगितले त्यावेळी रोहीत चंद्रशेखर नकवाल यांच्या ताब्यातील एक विना क्रमांक ग्रे रंगाच्या मोपेड गाडी (स्कूटी) मोटार सायकलच्या कागदपत्राची मागणी केली असता सर्वप्रथम उडवाउडवीचे उत्तरे देवून कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे सांगितल्याने पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता सदरची मोपेड मोटार सायकल वसंतनगर हददीतीतून मी व माझे सोबतचा साथीदार असे रात्री त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर जावून चोरी केली असल्याचे सांगितल्याने विना क्रमांक मोपेड गाडीचे चेसीस क्रमांक व इजिन क्रमांकाची पाहणी केली असता पोलीस स्टेशन वसंतनगर अप क्रमांक 319/2025 कलम 303(2) भान्यास मधील चोरीची असल्याची खात्री झाल्याने गुन्हयातील चोरीची मोटार सायकल व गुन्हयात वापरलेली स्कूटी क्रमांक MH-29-BZ-2722 अशा एकूण 02 मोटार सायकल किंमत 1,25,000/-मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम 1) रोहीत चंद्रशेखर नकवाल वय 23 वर्ष, रा. नवलबाबा वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ 2) शेख समीर शेख जमीर वय 23 वर्ष, रा.तलाव फैल यवतमाळ ह.मु. शिवाजी वार्ड पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यास पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 
                                                                                                
								










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














