मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या सामाजिक उपक्रमातून शोभा यात्रेत सहभागी असलेल्या भीमसैनिक मंडळाध्यक्षांना निळा फेटा बांधून स्वागत व सत्कार सुभाष चंद्र बोस चौक येथील आयोजित सभा मंडपात करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की मागील कित्येक वर्षापासून भीम टायगर सेना सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या असंख्य शोभा यात्रेतील भीम जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष यांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निळे फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन भीम सैनिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिल चेंडकाळे सर,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत वायकोसं, पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बि जे., अतिरिक्त पोलीस जिल्हा अधीक्षक पियुष जगताप, ठाणेदार उमेश बेशरकर,पीएसआय केदार साहेब,संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख,पुसद अर्बन बँकेचे शरद मैंद,एडवोकेटविश्वास भवरे, सौ.वसुधा भवरे, उद्योजक विठ्ठल खडसे सर,किशोर भाऊ मुजमुले पत्रकार विश्वकर्मा,बाबाराव उबाळे,संतोष मस्के, विजय निखाते,प्रज्ञा पर्व समितीचे, कार्याध्यक्ष राजेश ढोले, उपाध्यक्ष आनंदराव कांबळे, विजय लाव्हरे सर, एडवोकेट पद्माकर विघ्ने विशाल कांबळे नाना बेले, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार राजेश ढोले,शब्बीर शेख बाबू भाई, समाधान केवटे, विनोद कांबळे, सतीश शेवाळकर,प्रवीण टाकरस इत्यादी सहित अनेक कार्यकर्ता पत्रकार पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार बांधव,महिला पोलीस कर्मचारी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा सर्वच महत्व व्यक्तींचा निळे फेटे बांधून संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.* मुख्य आयोजक व टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे, विष्णू सरकटे,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजभिये यांनी केले तर आभार राजेश ढोले यांनी केले.भीम टायगर सेनेचे मीडिया सेलचे राजकुमार पठाडे, प्रभाकर खंदारे अण्णा दोडके, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.==================भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जयंती निमित्त शेकडो मंडळ अध्यक्ष, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी पत्रकार बांधव, पोलीस कर्मचारी, अधिकारी, यांना निळे फेटे बांधून सामाजिक उपक्रमातुन भीम टायगर सेनेच्या वतीने सुभाष चंद्र बोस येथील आयोजित सभामंडपात उच्चांक गाठला आहे हे मात्र विशेष.
