मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
धानोरा (ई) : जिओ कंपनीची इंटरनेट सेवा गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे धानोरा ईजारा सह आजूबाजूच्या पंधरा-वीस गावातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. पूर्वी धानोरा ईजारा व परिसरात आयडिया, बीएसएनएल चे सिमकार्ड वापरणारे ग्राहक होते. परंतु सदर कंपनीची इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्लो चालत असल्यामुळे अलीकडच्या काळात अनेकांनी आपले सिम जिओ मध्ये कन्व्हर्ट केले. सिंगरवाडी नांदुरा वडगाव चिखली कॅम्प पारवा वनवारला ब्राह्मणगाव आदी गावातील जिओ चे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
























