मुख्य संपादक सुर्यकांत राठोड.
सहसंपादक सिद्धार्थ कदम
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यीकरण व सुशोभीकरण समिती, धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवा निमित्त विविध विषयावर सकारात्मक चर्चा संपन्न झाली. मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री एडवोकेट इंद्रनील नाईक यांची नाईक बंगला येथे भेट घेऊन lडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण व सुशोभीकरण समितीचे अध्यक्षीय शिष्टमंडळ यांच्या समवेत पुढील डॉ बाबासाहेब आंबेडकरजयंती महोत्सव2025 अर्थात धमक्रांती प्रज्ञापर्व,मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभीकरण, संभाजीनगर येथील बुद्ध विहार या वास्तूचा देखील विकासात्मक व आर्थिक विकास निधी या संदर्भात या विषयाच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली सर्वच विषयावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण व सुशोभीकरण समिती शिष्टमंडळाचे अध्यक्ष,भीमराव दादा कांबळे शितल कुमार वानखेडे, किशोर दादा कांबळे, राजेश ढोले,महेंद्र कांबळे,धमक्रांती प्रज्ञापर्व समिती2025चे अध्यक्ष, मिलिंद जाधव सुनील खाडे,रवी तायडे,राहुल पाईकराव,भोलेनाथ कांबळे, महेश निखाते, शरद ढेंबरे, मधुकर सोनुने, प्रीतम आळणे, गोविंद कांबळे, कमलेश पाटील सर, एडवोकेट पद्माकर विघ्ने, उत्तम कांबळे,दिलीप पाईकराव सर, इत्यादी पदाधिकारी धम्म बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
