मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्ष संघटना मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, मनसे नेते राजूदादा उंबरकर आणि जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या सूचनेनुसार,तालुका अध्यक्ष संदीप लांडे व शहर अध्यक्ष आकाश रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत तालुका अध्यक्ष संदीप लांडे,शहर अध्यक्ष आकाश रहाटे,तालुका संघटक सचिन राठोड यांनी पुसद तालुक्यात पक्ष संघटना वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्य,शहर उपाध्यक्ष निखिल चव्हाण,शहर उपाध्यक्ष निकित पवार,शहर उपाध्यक्ष,कुणाल डहाळे,शहर उपाध्यक्ष,विशाल बाहेकर,तालुका उपाध्यक्ष,नारायण पागिरे,सागर चिंतावार,अर्जुन तालीकोटे,निखिल तालीकोटे,अनिल सूर्यवंशी,युवराज सूर्यवंशी,गणेश पगिरे,सूरज चव्हाण व पुसद तालुक्यातील मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
