मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक 30/07/2025 रोजी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हददीत फिर्यादी कृष्णा कवडुजी क्षिरसागर वय 54 वर्ष रा. इंद्रप्रस्थ प्लाझा येरावार चौक यवतमाळ यास अज्ञात आरोपीने त्यांची गाडी अडवून त्यास मारहाण करुन त्याचेकडील रोख रक्कम 28,000/- रु व 05 ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 32,000/- माल दरोडा टाकून चोरी करुन पळून गेले म्हणून अप क्रमांक 730/2025 कलम 311 अन्वये दिनांक 31/07/2025 रोजी गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हयातील उर्वरित अज्ञात आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध घेण्याबाबत मा. पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांनी सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पथकांने सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत गोपनिय माहीती काढली असता सदरचा गुन्हा नामदेव चव्हाण रा. गडद गव्हाण ता. जिंतूर जि. परभणी यांनी केला असल्याचे निष्पन्न केले.त्याप्रमाणे दिनांक 09/08/2025 रोजी स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पोलीस पथक अउघड गुन्हे, आरोपी शोध कामी उपविभाग पुसद व उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, सदर गुन्हयातील आरोपी नामदेव हिरामण चव्हाण हा Hero कंपनीची Splendar Pro मोटार सायकलने वडद बाजूकडे येत आहे. अशी माहीती मिळाल्याने नमूद पथक काटखेड फाटा येथे रवाना होवून सापळा लावून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने आरोपी 01) नामदेव हिरामण चव्हाण यास व त्याचे सोबत असलेल्या त्याचा भाऊ 02) संतोष हिरामण चव्हाण यांस मोटार सायकलसह ताब्यात घेवून आरोपी नामदेव चव्हाण यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सर्व प्रथम उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्यांने व त्याचा भाउ संतोष हिरामण चव्हाण व त्याचे इतर साथीदार मिळून केला असल्याचे सांगून सदरचा गुन्हा करते वेळी याच मोटार सायकलचा वापर केला असल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्रमांक 01) नामदेव हिरामण चव्हाण यास पोलीस कौशल्याचे वापर करुन अतिशय शिताफिने विचारपुस केली असता त्यांने व त्याचे साथीदार यांनी पाळोदी ता. पुसद येथील घरफोडी केली असल्याचे कबूल केल्याने त्याचे कडून गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत 60,000/- रु, पाळोदी येथील घर फोडी मधील 4000/- रु, व दोन मोबाईल 20,000/- रु असा एकूण 84,000/- रु मुददेमाल जप्त केला अशा प्रकारे पुसद शहर पोलीस स्टेशन अप क्रमांक 409/2025 कलम 331(4), 305 भान्यास हा गुन्हा उघड करुन पुढील तपास कामी नमूद आरोपी 1) नामदेव हिरामण चव्हाण वय 36 वर्ष, रा. गडद गव्हाण तांडा ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष हिरामण चव्हाण वय 40 वर्ष, रा. गडद गव्हाण ता.जिंतूर जि. परभणी ह.मु. फुलसावंगी ता. महागांव यास पुढील तपास कामी यवतमाळ शहर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
