मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १३ एप्रिलपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद येथे करण्यात आले आहे. या निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञाप्रर्वाचे उद्घाटन ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पूज्यनीय भदंत महाथेरो धम्मसेवकजी यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख वक्ते प्रसिद्ध सिने अभिनेता किरण माने आंबेडकरी विचारवंत मुंबई यांचे बीज भाषण ‘ *शिवराय ते भिमराय* पुरोगामी महाराष्ट्राची यशोगाथा’ या विषयावर होणार आहे. ८ एप्रिल रोजी अभुदय आर्ट अकॅडमी हैदराबाद संघ सरण गच्छामि यांचे नाटक प्रा. प्रशांत वासनिक यांच्या अध्यक्षते खाली होणारआहे. स्थळ यशवंत स्टेडियम पुसद ९ एप्रिल रोजी शाहीर सीमा पाटील शाहीर जॉली मोरे मुंबई यांचा *भारतीय संविधानाची गौरवगाथा* संगीतमय प्रबोधनात्मक बुद्ध भीम गायनाचा शाहिरी जेलसा यांच्या गायनाचा कार्यक्रम मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आहे. स्थळ यशवंत स्टेडियम पुसद १० एप्रिल रोजी आप्पाराव मैंद यांच्या अध्यक्षतेखाली अजिंक्य चांदणे सोलापूर यांचे ‘ *यांचे बाबासाहेब ते बुद्ध हाच मानव मुक्तीचा मार्ग* या विषयावर व्याख्यान होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दोन्ही पंचायत समिती पुसद ११ एप्रिल रोजी डॉ. वजाहत मिर्झा माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक ओम सुधा जे.एन. यु.दिल्ली यांचे *बहुजन समाजासमोरील आव्हाने* या विषयावर व्याख्यान होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पुसद १२ एप्रिल रोजी डॉ. राजेश वाढवे यांच्या अध्यक्षते खालील प्रा. लक्ष्मण यादव दिल्ली यांचे .*आंबेडकरी परिंपेक्षातून आजचा भारत* ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुनी पंचायत समिती पुसद १३ एप्रिल रोजी निलय भाऊ नाईक माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प गोळे पुणे यांचा *राहायला माडी फिरायला गाडी हातात सोन्याचं कड भिमरायामुळे माझ घराणं आलं पुढ* यांचा बुद्ध- भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर पुसद या सात दिवसीय धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कांबळे अध्यक्ष मिलिंद जाधव कार्याध्यक्ष राजेश ढोले सचिव प्रा. सुनील खाडे , उपाध्यक्ष अनंतराव कांबळे’ रवी तायडे, दिलीप पाईकराव, उद्धव कराळे, सहसचिव प्रा. भास्कर पाढेण, सुभाष काजळे, सुरेश कांबळे, कोषाध्यक्ष विजय बहादुरे,सहकोषाअध्यक्ष गोविंद कांबळे, विनोद कांबळे, संघटक कमलेश पाटील, प्रेम ठोके, महेश निखाते, सुरेंद्र कांबळे, भुजंग इंगोले, अशोक वाघमारे, सहसंघटक अविनाश कांबळे, अशोक लावरे.,सुनील वाठोरे, सिद्धार्थ कदम, देवा वाघमारे, राजरत्न लोखंडे, राजेश चंदन ढोले, योगेश दौलत हाडसे, आकाश धवसे, कार्यालयीन सचिव गणेश भगत, अमोल खंदारे, आकाश कांबळे, कैलास श्रावणे., कायदेशीर सल्लागार पद्माकर विघ्ने, सतीश पङघणे,. रॅली प्रमुख भारत कांबळे, राजू पठाडे, विशाल ङाके, *सुरक्षा समिती* प्रसिक खडसे अनिकेत भगत शुभम गवई साहिल शिरसाट मधुर खिल्लारे जयवंत उचित संतोष खडसे संदीप भगत राहुल धुळे धीरज कांबळे विश्वजीत हनवते 14 एप्रिल रोजी महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निमित्त सकाळी 7:00 वाजता पंचशील ध्वजारोहण सामूहिक बुद्ध वंदना सकाळी :900 वाजता मोटरसायकल रॅली सायंकाळी 4:00 वाजता अभिवादन रॅली समता सैनिक दलाची मानवंदना आदी कार्यक्रम होणार असून रात्री10:00 वाजता सामूहिक बुद्ध वंदना होणार आहे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या निमित्ताने प्रबोधनाची मेजवानी मिळणार.आपले लोकप्रिय… दैनिक वृत्तपत्राचे दैनिक पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक प्रतिनिधी आपण सर्वांनी प्रज्ञापर्व अर्थात धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या सर्व दिनाच्या उपस्थित राहून कार्यक्रमाचे वृत्त संकलन प्रसिद्ध करावे करिता नम्र निवेदन 🙏 कळावे आपला अध्यक्ष मिलिंद जाधव
