.. दि.29 ऑगस्ट माणुसकीच्या भिंतीचे मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या मानवीय कार्याची दखल घेत अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी जी.अमरावती येथील राष्ट्रसंताचे कार्याचे प्रचारक मा.ज्ञानेश्वरदादा रक्षक,जीवन प्रचारक मा.नामदेवराव गव्हाळे महाराज,संचालक मा.रवी दादा मानव व सत्यपाल महाराजांचे शिष्य व माणुसकीची भिंत मार्गदर्शक पंकजपाल महाराज यांनी माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय येथे सदिच्छा भेट दिली गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून पुसद
परिसरातील व उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना भाजी पोळी भात जिलेबी चे अन्नदान करण्यात आले माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या कार्याची त्यांनी माहिती घेतली व कार्याचे कौतुक केले यावेळेस उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह, वृक्षरोपटे, व शाल देऊन मान्यवरांचे सत्कार माणुसकीचे भिंत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस उपस्थित मान्यवर माणुसकीची भिंत मार्गदर्शक पंकज पाल महाराज,ज्ञानेश्वर दादा रक्षक,नामदेवराव गव्हाळे महाराज,रवीदादा मानव तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, मधुकर चव्हाण,अनंता चतुर,पंजाबराव ढेकळे,अरुण नागुलकर,अविनाश शेटे, नितीन बरडे,धनंजय आघाम, दीपक घाडगे उपस्थित होते.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















