मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
दैनंदिन जीवनातील वाटचाल बघता संपूर्ण देशाचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचारावर शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर विसर पडत असल्यामुळे मैत्रेय बुद्ध विहार लुंबिनी वन कवडीपूर यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण देशाचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे या निदात्त हेतूने प्रज्ञा सूर्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत वासनिक होते. तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर राजेश वाढवे,,प्राध्यापक सुधीर गोटे,मिलिंद हटेकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, गंगाबाई नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल चव्हाण,धमक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, मैत्रेय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ पाईकराव रिपब्लिकन वार्ता न्यूज चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले, सत्य लाईव्ह न्यूज चैनल चे मुख्य संपादक आसिफ खान, लाईव्ह न्युज चैनल चे संपादक मारुती भस्मे, इत्यादी मान्यवर स्टेजवर विरजमान होते. सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. संपूर्ण मान्यवरांचे आणि विद्यार्थी सहभागी करून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक बाळासाहेब कांबळे यांनी केले. विशेष अतिथी मिलिंद हट्टेकर, ठाणेदार सुरेंद्र राऊत, प्राध्यापक सुधीर गोटे, मिलिंद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतामध्ये या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असे प्रतिपादन मिलिंद हट्टेकर यांनी केले. अध्यक्ष मनोगतामध्ये प्राचार्य वासनिक यांनी प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेला शुभेच्छा दिल्या ह्या प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये पुसद तालुक्यातील असंख्य मुला मुलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैत्रेय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ पाईकराव होते उपाध्यक्ष विकास मनवर सचिव प्रफुल भालेराव जितू प्रधान,बाळासाहेब कांबळे, धम्मपाल पडघणे,सुभाष गायकवाड, प्रशांत राऊत, राजू खिल्लारे ,विलास कंकाळ, अनिल अंबादे, गजानन कांबळे, सुदीन खडसे अमोल कांबळे, हितेश इंगोले, शुधोधन कांबळे,सुनील कांबळे , गोविंद कांबळे, माधव कानगुले, नरेंद्र पाटील, अनिल दुम्हारे,पुंजाजी धुळधुळे,शिल्पा कंकाळ, रमा कांबळे मंजिरी राऊत, किरण भालेराव, प्राप्ती पठाडे, यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जितू प्रधान यांनी केले.
