मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पुसद :- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निरपराध लोकांवर काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवून 27 निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. यां भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पुसद शहरातील सकल हिंदू समाजातर्फे मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुकमोर्चा हा स्व. वसंतराव नाईक चौकातून निघून बस स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तेथून तहसीलवर समारोप करण्यात आला. यां मूकमोर्चा तुन यां दहशतवाद्याना गोळ्या घालण्यात याव्या व पाकिस्तानला धढा शिकविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















