मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत,दिनांक 06/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील मौजे-घाटोडी ता. पुसद येथील इसम नामे-सुनिल रोहीदास राठोड यांचे स्वतःचे ताब्यात लोखंडी तलवार असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लॉखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मौजे-घाटोडी येथे जावून त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता सर्वप्रथम उडवाउडवीचे व असमाधानकार उत्तरे देवू लागल्याने त्यास विश्वासात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन विचारपूस केली असता सदरची तलवार पिंपळखुटा शेतशिवारात लिंबाच्या झाडा खाली लपवून ठेवली असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता नमूद इसमांने पंचा समक्ष एक धारधार पाते असलेली लोखंडी तलवार किंमत रु 2000/-रु काढून दिल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-सुनिल रोहीदास राठोड वय 45 वर्ष, रा.घाटोडी ता. पुसद जि.यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्चये गुन्हा करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक/गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
